Navigated to गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad

गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad

Jun 2, 2022
8 mins

Episode Description

दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यातल्या भावना माणूस असो वा प्राणी, नाती असो वा निसर्ग प्रत्येकासाठी आजही ज्वलंत आहेत. म्हणून ही आपुलकी विरळ का होईना पण जिवंत तर आहे.

आजची ही स्टोरीही तीन पिढ्यांची आहे. एका पिढीत माणूसपण जिवंत आहे तर दुसरीत लोप पावलंय, आता हे पुढच्या पिढीला काय देणार हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला ही स्टोरी ऐकायला हवी. गोष्टीचं नाव आहे, गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!  ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने व कंपोज केलीये आकाश जाधव ने. विरळ होत चालेल्या भावनेवर आजही नितांत प्रेम करणाऱ्यांना समर्पित. गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!

Credits -

Writer - Dipak Bhutekar

Story Editor & Social Media - Sharda Bhawar

SFX, Sound & Packaging - Akash Jadhav

Anchor Voice Artist - Prasad Deshmukh


Voice over artists -

Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh


अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.

For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

instagram - @sjm_podcast   



See all episodes